“जिथे प्रेम, संस्कार आणि अभिमान एकत्र नांदतात, तिथे मराठी संस्कार – मराठी संस्कृतीची खरी ओळख”

आमच्या बद्दल थोडेसे …
नमस्कार, मी निर्मिता मोरे, आपल्या या परिता वर्ल्ड ब्लॉग मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत करते.
परिता वर्ल्ड ब्लॉगमध्ये तुम्हाला आपल्या संस्कृतीबद्दलची माहिती, वेगवेगळ्या स्थळांची माहिती, खाद्य संस्कृती माहिती मिळणार आहेच.तसेच विविध कला आणि त्या विषयाची माहिती पण मिळेल.या माध्यमातून आपण संस्कृतीची माहिती घेवूच पण तिची जपणूक ही करूया. काही नवीन कलाकृती, पाककृती, परंपरा अश्या अनेक गोष्टी आपण इथे अनुभवणारच आहोत.आपल्या नवीन पिढीला सोप्या आणि सहज समजेल अश्या प्रकारे मराठी भाषा,संस्कृती याची माहिती या परिता वर्ल्ड ब्लॉग द्वारे देण्याचा आमचा प्रयत्न आहे. या ब्लॉग मधून आम्ही संस्कृत भाषेतील श्लोक अर्थासह देणार आहोत. तसेच आपले सण,उत्सव,विविधतेने नटलेली आपली संस्कृती,संस्कार आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या गोष्टी यांचा अनुभव सर्वांना घेता येणार आहे.या ब्लॉग च्या माध्यमातून श्लोक,मंदिरांची माहिती ,सण ,उत्सव याबरोबरच वेगवेगळी खाद्य संस्कृती देखील आपण बघणार आहोत. प्रत्येक वेळी नवीन काही तरी बघायला,शिकायला मिळणार आहे. निरनिराळ्या कलाविष्कारांची माहिती हि आपण घेणार आहोत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्ही देखील तुम्हाला असलेली माहिती कमेन्ट करून किंवा इमेलद्वारे आमच्यापर्यंत पोहचवू शकता. कारण हि आपली सगळ्यांची संस्कृती आणि भ्रमंती आहे..


