कलाविश्व – भारत हा कला, संस्कृती आणि परंपरांनी समृद्ध असा देश. हजारो वर्षांपासून इथल्या लोकजीवनात कलेने विशेष स्थान मिळवले आहे. मंदिरांतील शिल्पांपासून घरातील रांगोळ्यांपर्यंत आणि गावागावातील मातीच्या भांड्यांपासून जगप्रसिद्ध विणकामापर्यंत—भारतीय कलाविश्व इतके विशाल आणि विविधतेने नटलेले आहे की त्याचे वर्णन शब्दात करणेही कठीण.
कलाविश्व म्हणजे विविध प्रकारच्या कलांचा विशाल आणि समृद्ध संग्रह. प्रत्येक कला प्रकार हा माणसाच्या भावना, संस्कृती, परंपरा, कल्पनाशक्ती आणि कौशल्य व्यक्त करण्याचा एक मार्ग असतो.
.कलाविश्व म्हणजे मानवी जीवनाला रंग देणारा विशाल, न संपणारा खजिना.
काही कला पाहिल्या जातात, काही ऐकल्या जातात, काही वाचल्या जातात आणि काही हातांनी अनुभवता येतात. प्रत्येक कला प्रकार समाजाचा इतिहास, परंपरा आणि मानवी भावनांना जिवंत ठेवतात .