मराठी खाद्यसंस्कृती – चव, परंपरा आणि आपुलकीची शिदोरी
जेवणापूर्वी अन्नदेवतेला स्मरून म्हटलेले वदनी कवळ घेता,पाटावर बसून जेवण्याची मजा,पुरणपोळी,वाफाळता वरणभात आणि त्यावर तुपाची धार… हीच आहे आपल्या मराठी खाद्यसंस्कृतीची खासियत!
मराठी खाद्यसंस्कृती – चव, परंपरा आणि आत्मियतेचे अतूट नातं पुरी-भाजीपासून पुरणपोळीपर्यंत, पिठलं-भाकरीपासून मटन रस्सा पर्यंत – प्रत्येक घासामध्ये आहे मायमाऊलीच्या हातचा प्रेमाचा स्पर्श.
खाद्यसंस्कृती म्हणजे केवळ जेवण नाही, ती आहे एक गोष्ट – जी आपल्याला आपल्या मुळांशी जोडते. सण असो वा समारंभ, प्रत्येक प्रसंगाचं वैशिष्ट्य म्हणजे खास मराठी संस्कृती जपणारी खमंग खाद्य संस्कृती.. “जेवण हे केवळ पोटासाठी नसतं, ते मनाला समाधान देण्यासाठी असतं हे समजणे हीच आहे मराठी खाद्यसंस्कृती ,जी देते पंचेन्द्रीयांना आनंद !”
गावरान चव, घरगुती पद्धती आणि पिढ्यानपिढ्या जपलेले स्वाद ,प्रत्येक प्रांतानुसार बदलणारी भाषा आणि खाद्य संस्कृती म्हणजे आपला महाराष्ट्र –
मिसळपासून थालीपीठापर्यंत, कोकणी सोलकढीपासून खानदेशी शेवभाजीपर्यंत – प्रत्येक भागाची स्वतःची खासियत!
“खाद्यसंस्कृती म्हणजे फक्त जेवण नाही, ती आठवणींची चव असते.”