भ्रमंती – निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा सोहळा
सह्याद्रीच्या रांगांमध्ये गुंजणारी शिवगर्जना, कोकणातला निळाशार समुद्रकिनारा, विदर्भाचं झाडांखाली वसलेलं शांत गाव, आणि पुण्या-मुंबईत धावणारा आधुनिक महाराष्ट्र…
परिता वर्ल्ड ब्लॉगमध्ये आपण अनेक प्रेक्षणीय स्थळांची , तिथल्या संस्कृतीची माहिती मनोरंजक पद्धतीने घेणार आहोत.
प्रत्येक वळणावर एक नवी कहाणी – हीच तर “भ्रमंती महाराष्ट्राची”!
इथे किल्ल्यांचा अभिमान वाटतो, तर कधी घाटांतून उगम पावणाऱ्या धबधब्यांची झिंग चढते! एकीकडे वऱ्हाडची परंपरा, तर दुसरीकडे कोकणातली प्रेमळ माणसं ! भटकंतीला मिळतो प्रांताप्रांताचा स्वाद आणि आठवणींचा खजिना!
“महाराष्ट्र फक्त पाहण्याची गोष्ट नाही, तो अनुभवायचा अगदी मनापासून!”
भ्रमंती म्हणजे विविधतेत एकतेचा सुरेख प्रवास
काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, कच्छच्या वाळवंटापासून अरुणाचलच्या हिरव्यागार डोंगरांपर्यंत —
भारत म्हणजे एक महासंस्कृती, एक महाकाव्य, आणि अनंत रंगांनी भरलेलं स्वप्न!
प्रत्येक राज्य, प्रत्येक भाषा, प्रत्येक चव, प्रत्येक पोशाख – वेगळा असूनही एकत्रित. बंगालचा रसगुल्ला, पंजाबचा पराठा, केरळची इडली , महाराष्ट्राची पुरणपोळी – पदार्थ बदलतात , पण आपुलकी मात्र तशीच राहते!
“भ्रमंती म्हणजे एक अनुभव आहे – तो चालत फिरून समजतो, आणि हृदयात साठवून ठेवावा लागतो “
काश्मीरच्या बर्फाच्छादित शिखरांपासून ते कन्याकुमारीच्या लाटांपर्यंत, वाराणसीच्या घाटांपासून ते राजस्थानच्या वाळवंटापर्यंत,
महाराष्ट्राच्या किल्ल्यापासून ते बंगालच्या समुद्रापर्यंत होणारा म् एक भावनिक प्रवास म्हणजे भ्रमंती..
या भूमीवर प्रत्येक मैलागणिक भाषा बदलते, पोशाख बदलतो, पण पाहुणचार मात्र सारखाच उबदार! प्राचीन मंदिरं, ऐतिहासिक किल्ले, रंगीबेरंगी बाजारपेठा आणि गावे प्रत्येक ठिकाणात एक कथा लपलेली आहे.
“भ्रमंती म्हणजे नुसता प्रवास नाही – ती आपल्याला आपल्या भूमीशी जोडणारी वाटचाल आहे.” “भ्रमंती – मन जिंकेल असा प्रवास!”