असंख्य परंपरांचा, शौर्यगाथांचा, आणि संस्कृतीचा वारसा लाभलेला हा आपला महाराष्ट्र! “जिथे प्रेम, संस्कार आणि अभिमान एकत्र नांदतात “
आईच्या गोष्टीतून शिकलेली माणुसकी, वडिलांच्या कृतीतून मिळालेला शिस्तीचा धडा, आणि आजीआजोबांच्या शब्दांतून आलेले अनुभव – हेच तर आपल्या संस्कारांचे मोल!
मराठी मातीचा गंध,आणि वाजतगाजत साजरी होणारी सणांची परंपरा — हीच तर आपली ओळख! आणि मनात बाळगलेली बंधुभावाची भावना – हेच महाराष्ट्राचे खरे वैभव!
संस्कार म्हणजे केवळ परंपरा नव्हे, ती जीवनाची दिशा आहे.
सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर “आपण काय शिकतो, कसे वागतो आणि पुढच्या पिढीला काय देतो – हाच आपल्या संस्कारांचा आरसा असतो.”
वडीलधाऱ्यांचा मान, अन्नाची कदर,मातीतली नाळ,आणि देवधर्माची निष्ठा – हेच तर आपले खरे संस्कार!
“संस्कार देतात माणसाला आकार आणि समाजाला आधार.”
संस्कारांमुळे संस्कृतीची गोडी अधिक खुलते!”